वैश्य नागरी सहकारी बँक लि. परभणी
वैश्य नागरी सहकारी बँक लि. परभणी चे आर्थिक रोप सन १९९७ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री कै. गोपीनाथरावजी मुंढे यांचा हस्ते दि. १० मार्च रोजी लावण्यात आले. सदर रोपट्याचे आज रोजी वटवृक्षात रूपांतर होऊन मुख्य कार्यालयासह पूर्ण मराठवाडा कार्यक्षेत्रात अकरा शाखा यशस्वीरीत्या कार्यान्वित आहेत.
'मना सोबत धन सांभाळणारी वैश्य बँक' या ब्रीद वाक्यानुसार सामाजिक व आर्थिक बाबींचे अवलोकन करून बँकेने तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन विविध योजनेद्वारे त्यांचा उत्कर्ष करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता बँकिंग क्षेत्रातील झपाट्याने होत असलेले कालानुरूप बदल पाहता बँकेने त्या सर्व बदलाच्या अनुषंगाने बॅंकेने वापरलेले तांत्रिक ज्ञान व बाबी अवलोकन करून आज रोजी सर्व शाखा सी. बी. एस . प्रणाली अंतर्गत पूर्ण झाल्या असून त्यातूनच व्यवहार होत आहेत.
सर्व सन्माननीय सभासद, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक यांचा गरजेनुसार तथा आवश्यकते प्रमाणे सर्वपरी सेवा देण्याचा मानस बँकेचा असून आधुनिकतेच्या धर्तीवर सर्व सेवा आज रोजी त्यांना पुरवीत आहोत.
Vaishya Nagari Sahakari Bank LTD Parbhani is Registered With DICGC
Dear Customer, Never ever share your card number, Expiry date, CVV , PIN, OTP, Password with anyone. This can be Misused. Vaishya Nagari Sahakari Bank Ltd
Never asks for such details.If you Receive such SMS/Call, Report to cyber-crime cell immediately.